Vadgaon Maval : आणखी एक हजार लाभार्थींना उद्या घरकुल मंजुरी पत्रकाचे वाटप

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यातील 1400 लाभार्थींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे एकूण 35 कोटींच्या स्वतःच्या हक्काच्या घरकुलांचे मंजुरी पत्रक प्रदान करण्यात आले असून उद्या दुसऱ्या टप्प्यात भेगडे लॉन्स वडगाव येथे आणखी एक हजार लाभार्थींना घरकूल मंजुरी पत्रक वाटप सोहळा होणार आहे. 

मावळ हे माझं कुटुंब आहे मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सारी स्वप्न आपण पूर्ण करूया त्यांना त्यांच्या हक्काची घरे देण्याचा आमचा संकल्प असून आमच्या माध्यमातून मावळ तालुक्यात PMRDA च्या मार्फत घरांचे सर्वेक्षण पूर्ण करून पहिल्या टप्प्यात 1400 लाभार्थींना घरकुल मंजुरी पत्रक देण्यात आले. येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात स्वतःच्या हक्काची 15 हजार घरे बांधून देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.