Pimple Saudagar : पिंपळे सौदागर  तिस-या सोमवारनिमित्त अमृत ग्रंथ पारायण सोहळा 

एमपीसी न्यूज  –  पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर येथे  शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवार दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .

त्याचे नगरसेवक  विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या  हस्ते दिपप्रज्वलन करून पारायणास सुरूवात करण्यात आली तसेच यावेळी पाउस चांगला झाल्यामुळे पवनामाई ( पवना नदी ) चे जलपूजन करण्यात आले यावेळी शिवशंभो सेवा मंडळांचे संस्थापक हभप माउली हांडे, मंडळांचे अध्यक्ष गणेश काटे, जयसिगं चव्हाण  बाळासाहेब काटे, मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे तसेच भाविक भक्त, ग्रामस्थ, महिलावर्ग   उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.