Pimpri : शहरातील ‘नीचे दुकान ऊपर मकान’ पद्धत मोडीत काढा – नाना काटे

एमपीसी न्यूज – रक्षाबंधन दिवशी पूर्णानगर, चिंचवड येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘नीचे दुकान ऊपर मकान’ पद्धत मोडीत काढावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिकेकडे केली आहे.

Pune : संभाजी भिडे गुरुजी यांच्या 2 आणि 3 सप्टेंबर रोजी पुण्यात होणार्‍या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारवी,अन्यथा तीव्र आंदोलन करणार

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी 18 फूट उंचीचे दुकाने बांधण्यात आलेली आहे. अशावेळी बाहेरील राज्यातून आलेली अनेक कुटुंबे या दोन मजली दुकानांचा पोटमाळा बनवून त्यामध्ये घरगुती वापरासाठी किंवा राहण्यासाठी उपयोग करताना दिसून येत आहेत.

दुकानांमध्ये जास्तीचा वेळ देता द्यावा आणि राहण्यासाठी वेगळे भाडे जाऊ नये यासाठी काटकसर म्हणून ते पोटमाळ्याचा उपयोग राहण्यासाठी करतात. मात्र, आपत्तकालीन परिस्थितीमध्ये या “नीचे दुकान उपर मकान” पद्धतीमुळे नागरिकांच्या जीवास धोका होताना दिसत आहे.

तर काही ठिकाणी दुकानाचे संरक्षण व्हावे यासाठी कामगारांनाही अशा दुकानांमध्ये मालक राहण्यासाठी प्रवृत्त करताना दिसून येत आहेत. पुणे शहरातही यापूर्वी असेच कपड्याच्या दुकानात लागलेल्या आगीमध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. यासाठी महापालिकेने बांधकाम परवाना विभागाकडून पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम किंवा पोटमाळे केवळ व्यवसायासाठीच वापरण्यात यावेत याबाबत मानवी जीवाचे रक्षण व्हावे या हेतूने कारवाई करावी अशी मागणी काटे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.