Chakan : दुकानातील भांडण सोडवणाऱ्या दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानात सुरु असलेले भांडण सोडवीत असताना दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये दुकानदार जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री पावणे दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौक, चाकण (Chakan ) येथे घडली.
संदीप शिवाजी गोसावी (वय 42, रा. गोसावीवस्ती, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय शिवाजी गोसावी, ऋषिकेश विजय गोसावी, एक महिला (सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुटकेवाडी चौकात फिर्यादी यांचे आईसक्रीमचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात आलेले देशपांडे यांना आरोपी मारहाण करत होते. दुकानात भांडण सुरु असल्याने फिर्यादी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपी विजय आणि महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
ऋषिकेश याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला सात टाके पडले. त्यानंतर आरोपींनी देशपांडे यांच्या दुचाकीचे आणि फिर्यादी यांच्या दुकानाची तोडफोड करत नुकसान केले. चाकण (Chakan ) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.