Nigdi : फ्लॅटच्या उघड्या दरवाजा वाटे आयफोन व लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – फ्लॅटच्या उघड्या दरवाजावाटे आयफोन व एक लॅपटॉप चोरीला गेला आहे. ही घटना यमुनानगर, निगडी (Nigdi) येथे बुधवारी (दि.23) घडली.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 58 किलो अफूचा चुरा पकडला

याप्रकरणी शुभम सुभाष खैरे (वय 26 रा निगडी) यांनी बुधवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या रूमचा दरवाजा उघडा राहिला होता. यावेळी चोराने रूममधून पंधरा हजार रुपयांचा आयफोन व 25 हजार रुपयांचा लॅपटॉप तसेच बॅगेतील आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक ऑफ इंडियाचे एटीएम व इतर काही कागदपत्रे चोरून नेली आहेत. याप्रकरणी निगडी (Nigdi) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.