Chinchwad : पीएमटी बस मधून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमटी बस मधून प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातून दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरांनी चोरले आहे. हा प्रकार बुधवारी (दि.23) मोरवाडी ते काळभोरनगर चिंचवड (Chinchwad)  या मार्गावर घडला.

Nigdi : फ्लॅटच्या उघड्या दरवाजा वाटे आयफोन व लॅपटॉप चोरीला

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पीएमटी बसमधून मोरवाडी चौक पिंपरी ते काळभोर नगर जयश्री टॉकीज बस स्टॉप दरम्यान प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांच्या गळ्यातील एक लाख साठ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरांनी गर्दीचा फायदा घेत चोरले आहे. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पिंपरी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.