Pune News : पीएमटी बसच्या प्रवासात तीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमटी बसने (Pune News) प्रवास करत असताना प्रवासात महिलेच्या पिशवीमधून तीन लाख 12 हजारांचे असे एकूण 13.7 तोळे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी कासारवाडी ते कुंदननगर या दरम्यान घडली.

याप्रकरणी 69 वर्षीय महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची मानलेली मुलगी पीएमपी बसने कासारवाडी ते कुंदननगर असा प्रवास करत होत्या.

Charholi : इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सव्वाचार लाखांचे साहित्य चोरणारे तीघे अटकेत

बस प्रवासात फिर्यादी यांनी त्यांचे 15 तोळे दागिने (Pune News) आणि त्याच्या पावत्या त्यांच्या मानलेल्या मुलीच्या पिशवीत ठेवले होते. प्रवासात अज्ञात चोरट्याने पिशवीतून तीन लाख 12 हजार रुपये किमतीचे 13.7 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.