Charholi : इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सव्वाचार लाखांचे साहित्य चोरणारे तीघे अटकेत

एमपीसी न्यूज – इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे (Charholi) चऱ्होली येथील मैदानात ठेवलेल्या साहित्यातील चार लाख 33 हजारांचे साहित्य तिघांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) पहाटे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

विजय उर्फ बाळ्या शिवाजी जोगदंड (वय 22), अविनाश अदिक जाधव (वय 25), स्वप्नील प्रताप शिंदे (वय 18, तिघे रा. चऱ्होली बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश अनिल गुंडगळ (वय 24, रा. भोसे, ता. खेड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri news : सांस्कृतिक लोकशाही शुद्ध राहिली तर राजकीय लोकशाहीला भवितव्य आहे – डॉ. श्रीपाल सबनीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलात त्यांच्या कंपनीने घेतलेल्या ऑर्डरचे काम सुरु आहे. त्यासाठी त्यांनी इव्हेंटचे साहित्य क्रीडा संकुलात ठेवले होते. तिथून आरोपींनी चार लाख 33 हजारांचे साहित्य चोरून नेले होते. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.