Moshi Crime : मोशी येथे टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव टँकरने दिलेल्या (Moshi Crime) धडकेत दुचाकीस्वार टँकर खाली चिरडला गेला. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (दि. 20) दुपारी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडला.

कुमार खंडू आल्हाट (वय 30, रा. तुपेवस्ती, मोशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय राजाराम दर्शले (वय 47, रा. पुनावळे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर (एमएच 14/जीडी 8478) चालक नंदू शिवाजी वाघमारे (वय 57, रा. रहाटणी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Nigdi burglary : निगडी येथे घरफोडीत दोन लाखांचे दागिने चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा खंडू आल्हाट (Moshi Crime) हा त्याच्या दुचाकीवरून रविवारी दुपारी साडेचार वाजता घरी जात होता. बोऱ्हाडेवाडी येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील टँकर भरधाव वेगात चालवून खंडू याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये खंडू रस्त्यावर पडला आणि टँकरखाली चिरडला गेला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.