Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 58 किलो अफूचा चुरा पकडला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Chinchwad) पोलिसांनी महाळुंगे गावात कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. हे तिघेजण राजस्थान येथून अफूचा चुरा आणून त्याची शहरात विक्री करीत होते. त्यांच्याकडून 58.288 किलो वजनाचा अफूचा चुरा आणि अन्य साहित्य असा एकूण 16 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Dighi : तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने विनयभंग करत दिली ऍसिड फेकण्याची धमकी

राकेश जीवन्राम बिष्णोई, कैलास जोराराम बिष्णोई, मुकेश गिरधारीराम बिष्णोई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिलकुमार जाट या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे काहीजण अफूचा चुरा आणून त्याची विक्री करण्यासाठी साठवणूक करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 58.288 किलो अफूचा चुरा, एक टेम्पो, चार मोबाईल फोन, 82 सिलेंडर टाक्या, एक वजनकाटा, एक मिक्सर, रिफिलिंग पाईप, सिलिंग पॅकिंग आणि रोख रक्कम असा एकूण 16 लाख 70 हजार 122 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींनी राजस्थान येथून हा अफूचा चुरा आणला आहे. त्याची शहरात पॅकिंग करून त्याची विक्री करण्याचे आरोपींचे नियोजन होते. सिलेंडरच्या गाडीतून हा अंमली पदार्थ आणला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.