Dighi : तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने विनयभंग करत दिली ऍसिड फेकण्याची धमकी

एमपीसी न्यूज- दिघी येथे एका तरुणीचा पाठलाग (Dighi) करत तिचा विनयभंग करून तिने विरोध केला असता तिला थेट ऍसिड फेकण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) घडली.

याप्रकरणी पीडीतेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी यश उर्फ करण संजय लोणारे (वय 19 रा.रहाटणी ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा सतत पाठलाग करत असे. फिर्यादीने त्याच्याशी लग्न करावे यासाठी त्यांनी फिर्यादीचा विनयभंग देखील केला.

Kalewadi : काळेवाडीत रिक्षा चालकावर कोयत्याने वार, एकाला अटक

त्यानंतर त्याने प्रेम संबंध ठेवण्यासाठी फिर्यादीकडे मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला. याचा राग येऊन त्याने तिला शिवीगाळ केली. या साऱ्या प्रकरणानंतर फिर्यादीच्या घरच्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने उलट त्यांना शिवीगाळ करत फिर्यादीवर ऍसिड टाकण्याची धमकी दिली.

त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने थेट पोलीस ठाण्यात जात त्याच्याविरुद्ध  (Dighi) तक्रार दाखल केली आहे. अद्याप आरोपीला अटक झाली नसून दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.