BNR-HDR-TOP-Mobile

Pune : …अन सुप्रिया सुळे, हेमंत रासने यांनी केला बैलगाडीतून प्रवास

एमपीसी न्यूज – हवेली तालुका कला, क्रीडा व सामाजिक संस्था आयोजित भव्य हवेली अजिंक्य पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली होती. गोऱ्हे गाव डोणजे फाटा, सिंहगड रोड येथे रविवारी ही स्पर्धा घेण्यात आली.

या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी एकत्रितपणे बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी नगरसेविका सायली वांजळे, संयोजक भरत चौधरी, भीमराव वांजळे, बाबुराव थोपटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्याच्या कुस्तीचे भविष्य असलेल्या सर्व नवोदित मल्लांचा उत्साह वाढविण्याचे काम अशा स्पर्धेतून होत असते. यामुळे आयोजकांचे मनःपूर्वक आभार तसेच सहभागी खेळाडूंना हेमंत रासने यांनी शुभेच्छा दिल्या.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like