Pune : खडकवासला विधानसभा मतदारसंघात नाना पाटेकर, रुपाली चाकणकर, भीमराव तापकीर, सचिन दोडके सामना रंगणार

एमपीसी न्यूज – आगामी खडकवासला विधानसभा निवडणुकीत (Pune)प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यात चांगलाच सामना रंगणार आहे.

खडकवासला मतदारसंघात नाना पाटेकर यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. रुपाली चाकणकर यांनीही निवडणूक लढविण्याची आपली भावना बोलून दाखवली. 2019 च्या खडकवासला विधानसभा निवडणुकीत सचिन दोडके यांचा केवळ 2500 मातांनी पराभव झाला होता.

Pune : कोथरूड येथे नव वर्षाच्या पूर्व संध्येला प्रभू श्रीरामाची आरती

त्यानंतर दोडके यांनी जोरदार जनसंपर्क वाढविण्यावर भर (Pune)दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये सहभागी असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत मतदारसंघ पिंजून काढत आहे. नाना पाटकेर यांच्या उमेदवारीबाबतचा प्रश्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाही अमरावती येथे पत्रकारांनी विचारला होता. त्यावर खडकवासला मतदारसंघ माझ्या घराजवळ आहे.

नाना पाटेकर माझे मित्र आहेत. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे का? हे मी अजिबात ऐकलेले नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. दरम्यान, नाम फाउंडेशनतर्फे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे.

नाना पाटेकर यांनी स्वतःहून जाहीरपणे खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत अद्यापही भूमिका जाहीर केली नाही. सिंहगड येथे नाना पाटेकर यांचे फार्महाऊस आहे. त्यामुळे ते बराच काळ खडकवासला मतदारसंघात मुक्कामी असतात. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचे नाव जोडण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.