Pune : पुण्यातील उच्चभ्रू भागातून तब्बल 1 कोटी १० लाख रुपयांचे अफिम जप्त

एमपीसी न्यूज – पुणे (Pune) पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील लोहगाव भागात कारवाई केली आहे. राजस्थानच्या ३२ वर्षीय व्यक्तीकडून १ कोटी १० लाख रुपयांचे अफिम हे अमली पदार्थ आहे.  राहुलकुमार भुरालाल साहु असे अटक केलेल्या अरोपीचे नाव आहे.

Pune : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचे TEAM_CM च्या सदस्यांनी वाचविले प्राण 

गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती हा लोहगाव भागात असलेल्या पोरवाल रोड येथे एका सोसायटी समोर आला असून त्याच्याकडे अमली पदार्थ आहे. यावरून पोलिसांनी त्याची चौकशी करत असताना त्याच्या जवळ ५ किलो ५१९ किलोग्रम एवढा अफिम हा अंमली पदार्थ आढळून आला.

नेमका हे अमली पदार्थ तो कोणाला विकणार होता याचा शोध सुरू आहे. लोहगाव हा भाग पुण्यातील एक उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जात असून अनेक प्रसिद्ध आणि नामांकित महाविद्यालय या भागात आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.