Pune : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचे TEAM_CM च्या सदस्यांनी वाचविले प्राण 

सोशल मीडियावर TEAM_CM च्या सदस्यांच होतय कौतुक

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल 1 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर (Pune)  येथील मेट्रोच्या उदघाटनासाठी आले होते. त्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे येत होते. त्यावेळी एका बसने त्यांना जोरात धडक दिली.

Pimpri : डोळे येण्याची साथ फोफावली, शहरातील 2723 जणांना प्रादुर्भाव

त्या घटनेत विठ्ठल सुर्वे गंभीर जखमी झाले. ही घटना पाहताच  पुणे शहरातील TEAM CM चे प्रमुख सुधीर जोशी आणि अन्य सदस्यांनी विठ्ठल सुर्वे यांना रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वेळेत दाखल केल्याने विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले आहेत.

यामुळे TEAM CM चे प्रमुख सुधीर जोशी आणि अन्य सदस्यांचे सोशल मीडियावर पुणेकर नागरिक कौतुक करित आहेत.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोशल फाऊंडेशन आणि शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील मेट्रोचे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उदघाटन झाले. या कार्यक्रमास शहरातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. या कार्यक्रमासाठी वडगावशेरी मतदार संघातील भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे येत होते.

कार्यक्रमस्थळी रस्ता ओलांडत असताना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांना जोरात धडक दिली. त्या घटनेमध्ये विठ्ठल सुर्वे यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे  डोक्यातून रक्त येण्यास सुरुवात झाली. TEAM CM चे प्रमुख सुधीर जोशी आणि अन्य सदस्यांना घटना दिसताच घटना स्थळाकडे धाव घेतली आणि जवळील संचेती रूग्णालयात तातडीने दाखल केले.

त्यामुळे विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले असून त्यावेळी TEAM CM चे प्रमुख सुधीर जोशी, आशुतोष शेंडगे, ऋषिकेश गोसावी, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर उपस्थित होते. तर शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशनतर्फे त्यांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचविल्याने सोशल मीडियावर TEAM_CM च्या सदस्यांच कौतुक होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.