Nigdi : आषाढाच्या चमचमीत सेलिब्रेशनसाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये आखाड स्पेशल मेजवानी

एमपीसी न्यूज – पाऊस सुरु झाला की ख-या खवय्यांना वेध लागतात ते चमचमीत नॉनव्हेजवर ताव मारण्याचे. त्यासाठी वाट बघितली जाते ती आषाढ महिन्याची. पावसामुळे आलेल्या गारव्यात चमचमीत पदार्थांची भूक जरा जास्तच लागते. आणि पुढे येणा-या श्रावणात मांसाहार करता येत नाही मग काय आषाढ म्हणजे मांसाहारी लोकांना पर्वणीच असते. आणि अशा वेळी ख-या खवय्यांसाठी मांसाहारी जेवणाच्या वेगवेगळ्या हटके डिशचा समावेश असलेला आखाड स्पेशल प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये सुरु झाला असल्याची माहिती राहुल गावडे यांनी दिली आहे.

नेहमीच्या त्याच त्या डिशपेक्षा थोड्या वेगळ्या खाद्यपदार्थांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश आहे. जेवणाची सुरुवात करण्यासाठी गोवन प्रॉन्स सूप, अळणी सूप, तांबडा आणि पांढरा चिकन रस्सा येथे आहे. यातील नारळाच्या दुधातील गोवन प्रॉन्स सूप चाखायलाच हवे असे. स्टार्टर्समध्ये देखील वेगवेगळ्या डिशचा समावेश आहे. सुकट मसाला, मालवणी प्रॉन्स सुख्खा, मच्छी फ्राय प्लॅटर येथे वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये सजवून आपल्यासमोर येतात. सुरमई, प्रॉन्स, बोंबिल, पाम्फ्रेट तवा रवा आणि कोळीवाडा या प्रकारातील येथे उपलब्ध आहेत. मुर्ग अनार कबाब हे स्पायसी, बीट वापरुन केलेले कबाब म्हणजे मस्ट ट्राय या प्रकारात मोडणारे. तीच गोष्ट मसाला चिकन रोस्ट या डिशची. ही पण खाऊन पाहायलाच हवी. त्याशिवाय खानदेशी मसालाप्रेमींसाठी खानदेशी सुक्का मटन, चिकन येथे उपलब्ध आहे.

मुख्य जेवणासाठीदेखील डिशमध्ये वैविध्य आहे. बोंबील रस्सा ही महाराष्ट्रीयन मसाल्याची डिश मत्स्यप्रेमींसाठी चाखून पाहायलाच हवी अशी. याशिवाय आखाड स्पेशल मटन करी आणि चिकन करी, इराणी मटन, चटपटा मटन खिमा, गावरान चिकनचा वापर करुन बनवलेले गावरान कोंबडी रस्सा, सावजी मटण, चिकन, सुकट कालवण आणि आखाड स्पेशलची खासियत असलेली मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी तर खाऊन पाहायलाच हवी.

मग वाट न पाहता आखाडाची चमचमीत मेजवानी एन्जॉय करण्यासाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागा येथे अवश्य या आणि मन आणि जिव्हा तृप्त करुनच जा.  हॉटेलमध्ये आल्यानंतर वेटिंग करायला लागण्यापेक्षा यायच्या आधी फोनवरुन आपले टेबल बुक करण्यासाठी 88880 77799 / 020 2765 7799 या क्रमांकावर फोन करा.

हॉटेल रागा,
स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,
फोन – 88880 77799 / 020 2765 7799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.