Wakad : पुर्ववैमनस्यातून व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज –  जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी एका व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करत दहशत पसरवली आहे. याप्रकरणी वाकड (Wakad ) पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हि घटना सोमवारी (दि.3) रात्री काळेवाडी येथील ज्योतीबा नगर येथे घडली.

Pune : पुणे पोलिसांचे मिशन ऑल आऊट, 159 सराईत केले गजाआड

शोएब सईद कुरेशी (वय 23 रा.काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सलमान शेख (वय 24 रा. काळेवाडी) याला अटक केली आहे, तर नरसिंग जाधव (वय 22 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काळेवाडी येथे एस.के. कॅटल फिड्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी दुकानावर असताना आरोपी कोयता घेऊन तेथे आले व त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीवर कोयत्याने वार केला. फिर्यादींनी वार चुकवला.

मात्र यात फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान झाले. यावेळी आरोपींनी हातातील कोयता फिरवत हम यँहा के भाई है, जो भी हमको क्रॉस जायेगा उसको जिंदा नही छोडेंगे म्हणत आरडा-ओरड करत परिसरात दहशत निर्माण केली. यावरून वाकड (Wakad ) पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.