Wakad : सावत्र आईने केला मुलीचा खून; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून सावत्र आईने मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण करत तिचा खून केला. त्यानंतर मुलगी फरशीवरून पडली असल्याचे खोटे सांगत रुग्णालयाची आणि पोलिसांची दिशाभूल केली. याप्रकरणी वाकड (wakad) पोलिसांनी सावत्र आईच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहायक निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी वाकड (wakad)  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : समजाविण्यासाठी गेलेल्या सहा महिलांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील किराणा सामान संपले. सामान संपण्यापूर्वी तू मला का सांगितले नाही, असे म्हणत सावत्र आईने 13 वर्षीय सावत्र मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण केली. यात मुलीच्या हातावर, पायावर, पाठीवर, डोक्याला मार लागला. तसेच आरोपीने मुलीच्या छातीवर हाताने, पायाने मारून तिला गंभीर दुखापत केली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

मुलगी बेसावध झाल्याचे लक्षात येताच आरोपी आईने मुलीला थेरगाव येथील महापालिका रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करताना मुलगी घरात पायऱ्यांवरून घसरून पडली असल्याचे आरोपीने सांगितले. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्यास सांगितले.

पोलिसांनी पाहणी केली असता मुलीला कुठेही जखम झाली नव्हती. तसेच तिच्या शरीरावर मारल्याचे व्रण दिसत होते. त्यामुळे वाकड (wakad)  पोलिसांनी माहिती देणाऱ्या सावत्र आईकडे चौकशी केली असता तिनेच मुलीचा खून केल्याचे उघड झाले.

आरोपी महिलेचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान पतीचे निधन झाले. पतीला पहिल्या पत्नीपासून चार अपत्य आहेत. सर्वात मोठी मुलगी 13 वर्षांची होती. घरातील बहुतांश कामे तिला करावी लागत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.