Alandi : आळंदी शहराचा दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज-  पुणे महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांचे मधील झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार (Alandi) धरणाची पाणीपातळी खालावल्यामुळे दि.18 मे पासून दर गुरुवारी भामआसखेड जलाशयातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेस पुणे महापालिकेने पत्राद्वारे कळवले आहे.

Wakad : सावत्र आईने केला मुलीचा खून; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

त्या अनुषंगाने आळंदी शहरास दर गुरुवारी होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी गावठाण व हवेली विभाग यापैकी गुरुवारी पाणी वितरणाचा दिवस असलेल्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी करण्यात येणार असून तद्नंतर रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

नागरिकाने सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे. याबाबत माहिती पाणीपुरवठा आधिकारी अक्षय शिरगिरे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.