Dhankawadi : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीतील खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, माजी शासकीय क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, गुरुवर्य गजानन मारुती पाटील यांच्या ६१ व्या जयंती निमित्ताने नुकतेच धनकवडी (Dhankawadi) येथील भारती विद्यापीठ संस्थेच्या सभागृहामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्धल क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू त्याचबरोबर कठीण परिस्थितीत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.

Alandi : दागिने घेतले, लग्नाचा खर्च करायला लावला मात्र लग्नाला नकार; वर मुलासह पाच जणांवर गुन्हा

गौरी पाटील यांनी पाटील यांच्या स्मरणार्थ गुरुवर्य गजानन पाटील क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना केली असून या अंतर्गत क्रीडा क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबविले जातात. पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष होते.

या प्रसंगी अर्जुन पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार (Dhankawadi) विजेत्या पहिल्या महिला खेळाडू शकुंतला खटावकर, माजी उपसंचालक क्रीडा कार्यालय, पुणे जनक टेकाळे, श्रीकांत जाधव, गजानन पाटील यांच्या मातोश्री, बनू पाटील, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे, खेळाडू शिवशंकर वाले, कृष्णकुमार राणे, सुजित तिकोडे, सुदेशना शिवणकर, कालिदास हिरवे, दिव्या घोडेकर, श्रावी कुचे, साई सुधीर कवडे, लियाकत शेख, कृष्णकुमार राणे, सुवर्णा घोलप यांना खटावकर यांच्या हस्ते गुरुवर्य गजानन पाटील क्रीडा पुरस्कार (Dhankawadi) देण्यात आले.

यावेळी क्रीडाप्रेमी सतिश शंकर तटकरे यांनी त्यांचे वडिल शंकर कृष्णाजी तटकरे यांच्या स्मरणार्थ रुपये २५००० प्रतिष्ठान साठी देणगी म्हणून दिले. साची सुहास पांडे हिने स्वागत गीत आणि समारोपावेळी पसायदान सादर केले. दत्तात्रय झोडगे यांनी आभार मानले. दीपाली गोडसे यांनी सूत्र संचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.