Dhankawadi: धनकवडी येथे विकसित भारत संकल्प यात्रा 

एमपीसी न्यूज – केंद्र शासन पुरुस्कृत योजना महानगरपालिका (Dhankawadi)स्तरावर तळागाळातील नागरीकापर्यंत पोहोचण्यासाठी व योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता करण्यासाठी बुधवारी (दि. 17) “विकसित भारत संकल्प यात्रा  धनकवडी – सहकारनगर कार्यालया अंतर्गत धनकवडी शेवटचा बस स्टॉप येथे आयोजित करण्यात आलेली होती.

Pune: आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतून रामायणाचे अनोखे सादरीकरण

 या मोहिमेमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे, केंद्रीय मंत्री, (Dhankawadi)आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त आयुक्त डॉ. श्री. कुणाल खेमनार, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, राणी भोसले, श्रीकांत जगताप, मोहिनी देवकर, आशा राऊत, नितिन उदास, सुरेखा भणगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनुने, पुणे महानगरपालिका तसेच अन्य सन्माननीय पदाधिकारी , अधिकारी ,  कर्मचारी  व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
अश्विनी कुमार चौबे यांनी केंद्र शासन पुरुस्कृत विविध योजनाबाबतची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांकडून समजून घेतली. शासनाच्या योजना अगदी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवीने बाबत मार्गदर्शन केले.

या मोहिमेमध्ये केंद्र शासन यांचेमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याबाबतचे विविध उपक्रम यांचे पुणे मनपाच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये आयोजन करण्यात आले होते.
   तसेच “विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमे अंतर्गत पंतप्रधान स्वानिधी , उज्वला योजना, क्षय रोग असणाऱ्या पात्र लाभार्थी यांना किट व ऑनलाईन डिजिटल रेशन कार्ड प्रमाणपत्र याचे पात्र लाभार्थी यांना  अश्विनी चोबे व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
   या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विकसित भारत प्रतिज्ञा व रॅम्प साँग तसेच हुजूरपागा विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पंचप्राण या विषयावर बलसागर भारत होवो, या विषयावर पथनाट्य यांचे अप्रतिम असे सादरीकरण केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अलका जोशी यांनी केले.  प्रसंगी उपस्थित सन्माननीय पाहुणे व पदाधिकारी यांचा मनपाच्या वतीने उचित सन्मान करण्यात आला. या  उपक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित मान्यवर, सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व नागरीक यांचे सुरेखा भणगे  यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.