Alandi: शिवस्मारकाच्या पायरी लगत नव्याने केलेल्या अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज –आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर (Alandi)नव्यानेच  टपरी व स्नॅक्स सेंटरच्या गाडीची अतिक्रमणात भर पडलेली दिसून येत आहे. एक बाजू टपरी, हातगाडी यांनी वेढलेलीच आहे.

त्यात दुसऱ्या मोकळ्या बाजूच्या जागेत अतिक्रमण होताना दिसून(Alandi) येत आहे.याबाबत एम पी सी न्युज ने दि.16 जानेवारी रोजी बातमी प्रसारित केली होती.मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी तत्काळ याची दखल घेत तेथील अतिक्रमण काढण्याबाबत अतिक्रमण विभागाला सूचना दिल्या होत्या.शिवस्मारकाच्या पायरी लगत नव्याने उभारलेली ती अतिक्रमणे काढल्याचे आज दि.18 रोजी सायंकाळी दिसून येत होते.

 

TDR : करोडो रुपयांचा टीडीआर घोटाळा झाला असतानाही पालकमंत्री अजित पवार यांच्या डोळ्यावर पट्टी – एकनाथ पवार

अतिक्रमण विभागाने सक्रिय होत आळंदी शहरातील फुटपाथवरील व पालिकेच्या जागेतील इतर अतिक्रमणे काढावीत असे यावेळी स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.