Dhankawadi : पैशासाठी तगादा लावला म्हणून धनकवडीत एकाची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – उसने घेतलेले पैसे (Dhankawadi) परत देण्यासाठी तगादा लावला म्हणून 42 वर्षीय नागरिकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना धनकवडी येथे घडली आहे. यावरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजिनाथ सर्जेराव लोखंडे (वय 42, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत लोखंडे यांच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सहकारनगर पोलिसांनी रामदास काशिनाथ त्र्यंबके (रा. बाभळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. जांभुळवाडी, आंबेगाव, कात्रज), मयूर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet : रावेतला होणार अग्निशमन केंद्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे यांचा भंगार माल खरेदी व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी आरोपींकडून हातऊसने पैसे घेतले होते. व्यवसायातील मंदीमुळे लोखंडेने पैसे परत करण्यास उशीर (Dhankawadi) केल्याने उसने घतलेले पैसे परत न केल्याने आरोपींनी लोखंडे यांना शिवीगाळ करून त्रास देण्यास सुरुवात केली.आरोपींनी मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपींनी दिलेल्या धमकीमुळे लोखंडे तणावाखाली होते. आरोपींच्या धमकीमुळे लोखंडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोखंडे यांची पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.