Talegaon Dabhade : समजाविण्यासाठी गेलेल्या सहा महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज – भावाच्या दुसऱ्या बायकोला समजाविण्यासाठी (Talegaon Dabhade) गेलेल्या नंणदेला व तिच्या सोबतच्या इतर पाच महिलांना भावाच्या बायकोने चांगलीच मारहाण केली आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि.15) दुपारी घडला.

याप्रकऱणी 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून यश, संकेत, गणेश, सुनिल व ओम व त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Maval : ऐतिहासिक साते गावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची भावजयी, आजी व इतर तीन महिलांसह भावाच्या दुसऱ्या बायकोला समजाविण्यासाठी गेल्या होत्या. मात्र (Talegaon Dabhade) भावाच्या बायकोने आरोपींना बालावून घेत पिर्यादी व त्यांच्या सोबतच्याना शिवीगाळ केली. तसेच हाताने, दगडाने व लाकडे स्टूलने मारत जखमी केले. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.