Maval : ऐतिहासिक साते गावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – (श्याम मालपोटे) श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची (Maval) जन्मभूमी असणाऱ्या वडगाव जवळील ऐतिहासिक साते गाव येथे दि.14 रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही साते येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील तरुण तरुणींनी एकत्र येत किल्ले पुरंदर ते साते येथे शिवज्योत आणली. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात ज्योतीचे व सर्व युवक युवतींचे स्वागत केले, गावातील प्रत्येक घरांवर भगवा झेंडा उभारला होता.

संपूर्ण गावात ज्योत प्रदक्षिणा करण्यात आली नंतर ज्योत पूजन आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडपसमोर भव्य रांगोळी काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक पालखी सजवून शंभू महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली.

सर्व युवक आणि युवतींनी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती. त्यात विशेष रथामध्ये (Maval) छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर श्री संभाजी महाराज यांची वेशभूषा आकर्षक ठरत होती. सायंकाळीं शिवकालीन मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील लहान मुले आणि युवतींनी लाठी काठी प्रात्यक्षिक सादर केले.

Akurdi : खंडोबा चौकातील पालखी सोहळा शिल्पांचे पावित्र्य जपावे – विशाल काळभोर

साते गावामध्ये काही दिवसांपूर्वी लोकार्पण झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर विविध मर्दानी कला सादर झाली. दरम्यान श्रीमान रायगडावरील होळीच्या माळावरील होणारा मर्दानी खेळाचे स्वरूप गावकऱ्यांनी अनुभवले. संध्याकाळी सरसेनापती हंबीरराव मोहिते हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.