Akurdi : खंडोबा चौकातील पालखी सोहळा शिल्पांचे पावित्र्य जपावे – विशाल काळभोर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Akurdi) आकुर्डी येथील खंडोबा चौकात मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्यातील शिल्प बसवली आहेत. मात्र, काही नागरिक या चौकातून जाताना-येताना पान, गुटखा अथवा तंबाखू खाऊन थुंकत आहेत. त्यामुळे या शिल्पांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे शिल्प काढून नागरिकांना दिसेल अशा योग्य ठिकाणी बसवून त्याचे पावित्र्य जपावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी अ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने जात असतो.

यंदाही जून महिन्यात पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरून तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निगडीहून पुण्याकडे मार्गस्थ होत असतो. त्यामुळे शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने निगडी, आकुर्डी, चिंचवड येथे पालखी सोहळ्यावर शिल्प बसविले आहेत.

Air Force News : हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारला पदभार

आकुर्डीतील खंडोबा चौकात चौक सुशोभीकरण अंतर्गत पालखी सोहळा शिल्प बसविले आहेत. या चौकातून जाताना-येताना नागरिक पान, गुटखा अथवा तंबाखू खाऊन थुंकत आहेत. त्यामुळे या (Akurdi) शिल्पांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भावना दुखावल्या जात आहे. वास्तविकता आपण अ क्षेत्रीय कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधून हे शिल्प स्वच्छ धुवून घेतले आहेत. मात्र, त्यानंतरही थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे हे शिल्प काढून नागरिकांना दिसेल अशा योग्य ठिकाणी बसवावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.