Wakad : गाडी हळू चालव म्हणत तरुणाला चौघांकडून माराहाण

एमपीसी न्यूज – गाडी हळू चालव म्हणत चौघांनी एका 18 वर्षीय तरुणाला मारहाण केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.10) रहाटणी येथे घडला.

Mahalunge : किरकोळ कारणावरून वडापाव चालकाकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

याप्रकरणी यश राजकुमार कांबळे (वय 18 रा. रहाटणी) याने वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विशाल कांबळे (वय 22) अजय कांबळे व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकी चालवत असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या आरोपींनी ए जाड्या गाडी हळू चालव म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने त्याच्या दोन साथीदारांनाही बोलावून फिर्यादीला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यावरून वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.