Mahalunge : किरकोळ कारणावरून वडापाव चालकाकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – वडापावच्या गाडीवर किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला तिघांनी बेदम मारहाण केली आहे. हि घटना शनिवारी (दि.10) खालुंब्रे येथे घडली आहे.

Chikhli : लहान मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला अटक

याप्रकरणी अक्षय नागेश जाधव (वय 28 रा.येलवाडी, खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कोकाटे वडापाव सेंटरचा मालक व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी हे कोकाटे वडापाव येथे गेले व त्यांनी पाच वडापावची ऑर्डर दिली व 100 रुपये दिले. वडापावचे 75 रुपये झाले होते. तरी दुकानादराना वडापाव उर्वरीत रक्कम फिर्यादीला दिली नाही.

यावेळी फिर्यादी यांनीवडापावची मागणी करत तेथे असलेल्या मुलाला बाजूला केले. याचा राग येवून आरोपींनी शिवीगाळ करत हाताने व प्लास्टीक पाईपने मारहाण केली आहे. यावरून म्हाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.