Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : हडपसर (Pune) परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली. यात पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली आहे. अज्ञात आरोपी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Chinchwad News : जनता सहकारी बँक लि.पुणे चिंचवडगांव शाखेचे स्थलांतर

सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला, याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस (Pune) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.