Pune: शरद पवार यांनी ईडीच्या गैरवापराचा तपशील केला जाहीर 

एमपीसी न्यूज – भाजपकडून होत असलेल्या ईडी गैरवापराचा(Pune) तपशील माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. ईडीकडून गेल्या 18 वर्षात झालेल्या कारवाईचा तपशील मांडत रोहित पवार यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न पवारांनी केला. 
भाजप सत्तेत आल्यापासून आठ वर्षात(Pune) 121नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षांच्या सरकारामधील १४ मंत्री, 24 खासदार, 21 आमदार यांच्यासह 7 माजी खासदार, 11 माजी आमदारांचा समावेश आहे.
काँग्रेस प्रणित युपीए काळातील दहा वर्षात 26 नेत्यांवर कारवाई झाली. त्यामध्ये पाच काँग्रेस नेत्यांचा समावेश असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या केवळ तीन नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप राजकीय सुडापोटी कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले असून कोणत्या नेत्यावर कारवाई करायची, याचे आदेश भाजप कार्यालयातून जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही. त्याउलट ज्या विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप प्रवेश केला त्यांची चौकशी थांबविली जात आहे. हसन मुश्रिफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव ही त्याची काही उदाहरणे आहेत.
अनेक वेळा ईडी कोणावर कारवाई करणार, हे भाजपच्या नेत्यांना माहिती असते. त्यांच्याकडून तशा धमक्याही दिल्या जातात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची, याचे आदेश भाजप कार्यालयातून जात आहेत. ईडीची कारवाई म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीला उभे राहू नका, अशी अप्रत्यक्ष धमकी असल्याचे पवार यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=tnaCrgfh7Qc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.