Chakan: संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ ? खा. अमोल कोल्हे यांचा सवाल

चाकण मध्ये शिवसेना ( उद्धव ठाकरे ) गटाचा मेळावा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जातात, त्यापैकी सध्या 39 खासदार महायुतीचे (Chakan)आहेत. मात्र केंद्र शासनाला प्रश्न विचारण्याची हिम्मत या 39 खासदारांमध्ये नाही. त्यामुळे संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे?  याचा विचार जनतेने करावा असा जोरदार हल्ला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकण ( ता. खेड ) येथील शिवसेना ( (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मेळाव्यातून महायुतीवर केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिरूर लोकसभा मतदारसंघ मेळावा रविवारी (दि. 10)  चाकण ( ता. खेड ) येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केले होते. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिरुर मधील ठाकरे गटाच्या मेळ्याव्याला हजेरी लावली. या मेळाव्यातील कार्यक्रमात खासदार कोल्हेंनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी खासदार कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे? अशा शब्दात खासदार कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचे काम झालं आहे. कांदा निर्यातबंदी लागल्यावर खासदारांची तोंड शिवली होती का? असा सवाल खासदार कोल्हे यांनी  उपस्थित केला.
कार्यकर्त्यांना आवाहन करताना कोल्हे म्हणाले कि, आता गाफील राहू नका, राज्याची परिस्थिती बदलत आहे. शेतकऱ्याच्या पोराला रोखण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांनी ताकद लावली आहे. गाफील राहू नका. पळपुट्या लोकांचा नाही ; तर ताठ मानेने लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. खासदार गल्लीत बोलत फिरण्यापेक्षा संसदेत गरजणारा हवा असे ते यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर म्हणाले कि, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका म्हणजे विचारांचा, तत्त्वांचा लढा असणार आहे. तत्वांशी एकनिष्ठ राहत पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवत आपण सत्यासाठी लढणार आहोत. पुढील काळ हा संघर्षाचा असून शेतकरी बांधवांना, कष्टकऱ्यांना, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकरी विरोधी सरकार घालवून पुन्हा बळीराजाचे राज्य स्थापन करण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढायचे आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिक खा. अमोल कोल्हे यांच्या सोबत राहतील असा विश्वास अहिर यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्यास जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, अमोल पवार, बाबाजी काळे, शैलेश मोहिते, यांच्यासह शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.