Ayodhya Deepotsav : 22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळली रामनगरी, अयोध्येने केला नवा विक्रम

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री योगींच्या उपस्थितीत  दीपोत्सव 2023 मध्ये 22.23 लाख दिवे प्रज्वलित (Ayodhya Deepotsav) करून मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांची नगरी असलेल्या अयोध्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. गेल्या वर्षी 2022 मध्ये लावलेल्या 15.76 लाख दिव्यांच्या तुलनेत यावेळी ही संख्या अंदाजे सहा लाख 47 हजार अधिक होती. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या दिव्यांच्या मोजणीनंतर दीपोत्सवाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. 

Today’s Horoscope 12 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी उत्तर प्रदेश सरकारचा हा ‘भव्य दीपोत्सव’ पाहिला (Ayodhya Deepotsav)आणि शेवटी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याच्या जागतिक विक्रमाचा दर्जा दिला. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचे शिक्षक, आंतर महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचा विक्रम करण्यात मोठा वाटा आहे.

दिवे लावण्याची नियोजित वेळ सुरू होताच ‘श्री राम जय राम जय जय राम’च्या जयघोषाने एक एक करून 22.23 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी विक्रमाची घोषणा करताच संपूर्ण अयोध्या ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दुमदुमली.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे कार्यकारी स्वप्नील डांगा करव  व सल्लागार निश्चल बारोट यांनी ड्रोन मोजल्यानंतर ही माहिती दिली. याआधी गेल्या वर्षीही दिवा लावण्याचा विक्रम झाला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सुपूर्द केल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण अयोध्येला शुभेच्छा दिल्या.

हजारो स्वयंसेवक दिव्यांची सजावट करण्यात गुंतले होते

दीपोत्सवाची तयारी खूप आधीपासून सुरू होती. यामध्ये हजारो स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्याने दीपोत्सव कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शरयू घाटावर दीपोत्सवाची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते.

दीपोत्सवासाठी अयोध्या नववधूसारखी सजली होती. मान्यतेनुसार, ज्या दिवशी प्रभू राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले, त्या दिवशी अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावून दिवाळी साजरी केली. तेव्हापासून दिवाळीची परंपरा सुरू(Ayodhya Deepotsav) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.