Today’s Horoscope 12 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 12.11.2023.

शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.

आज विशेष – नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन, अभ्यंग स्नान.

राहू काळ – सायंकाळी 4.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – स्वाती.

चंद्र राशी – तुळ.

—————————–

मेष  ( शुभ रंग – जांभळा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह असेल. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्याकडून होईल.

वृषभ ( शुभ रंग- गुलाबी)

कुठली ही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणे असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

मिथुन  ( शुभ रंग- क्रीम)

नेहमीचे तेच तेच काम तुम्हाला कंटाळवाणे वाटेल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. काही जणांना गुढ शास्त्रात रुची वाढेल

कर्क ( शुभ रंग – पिस्ता)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.

सिंह ( शुभ रंग – लाल )

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासापेक्षा खेळातच रमतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा करू नये.

कन्या ( शुभ रंग- निळा)

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

तूळ ( शुभ रंग- लाल)

आज स्वतःचेच खरे करू नका इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावध असावे.

वृश्चिक ( शुभरंग – मोरपंखी)

संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे बचतीचा विचार सोडून द्या. आज तुम्ही यथाशक्ती दानधर्मही कराल. थोरांशी वाद टाळा.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

मकर (शुभ रंग- मोतिया)

कार्यक्षेत्रात ध्येयाच्या दिशेने तुमची वेगाने घोडदौड चालू आहे. आज यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्याही महत्त्वाकांक्षा वाढतील. आज कुसंगती पासून लांबच रहा.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

मीन ( शुभ रंग- चंदेरी)

कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा, आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.