Bail pola Celebration: जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे श्रावणी बैल पोळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज: दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मु.पो.शिरोली बुद्रुक ता.जुन्नर जि. पुणे येथे बैलपोळा सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.(Bail pola Celebration) गावातील मानाची बैलजोडी म्हणुन ग्रामस्थांच्यावतीने दरवर्षी शेतकरी अनिल डबडे व बैलजोडी घेऊन येणा-या शेतक-यांचा सत्कार ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला. लहान मुलांनपासुन ते वयोवृध्द नागरिक, महिला, पुरुष या सणामध्ये सहभाग घेऊन आनंद लुटतात.

ग्रामिण भागात बैलपोळा म्हणजे सर्व पाहुण्यांना पुरणपोळ्यांचे जेवण, पाहुणे मंडळी, नातेवाईक यांची रेलचेल असते. सकाळी बैलांना आंघोळ घालुन हार तुर्यांनी सजवले जाते.(Bail Pola Celebration) बाशिंग बाधुन, गळ्यात घूंगरमाळा, हार पायात, गळ्यात घालुन, डोळ्याला काजळ लावुन, शिंगाना रंग लावून, बेगाड लावून, फुगे लावुन बैलांना चांगले सजवून गावातुन भव्य मिरवणुक काढली जाते. सर्व ग्रामस्थ या मिरवणुकीसाठी शेतातून गावात हजर राहतात. यावेळी सुध्दा डीजे लावुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. आनंदाने हा बैलपोळा सण साजरा केला गेला. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ अनुसयाबाई डबडे वय 97 वर्षे, श्रीमती ताईबाई सोनवणे वय 75 यावेळी उपस्थित राहुन बैलांसमोर उभे राहुन फोटो काढुन आनंद घेतला.

Today’s Horoscope 28 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याप्रसंगी शिरोली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन विधाटे, पोलीस पाटील अमोल थोरवे, गणेश राऊत, रामदास बो-हाडे, गणेश डबडे, डाॅ.बी.व्ही.राऊत,(Bail Pola Celebration) निवृत्ती वाणी, सागर सोनवणे, नीलेश डबडे, विनायक थोरवे, महेंद्र थोरवे, रोहीदास भुजबळ, संजय मका, महादू शेरकर, शंकर लोहकरे इ.अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व गावातुन बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.