Ganpati Festival : शाडूमातीचीच गणेशमूर्ती बसविण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

एमपीसी न्यूज: संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 26 ऑगस्टला आकुर्डी परिसरातून पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले.(Ganpati Festival) यावेळी प्रभाकर मेरुकर यांनी 822 विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले असून शाडूमातीचाच गणपती बसविणार असल्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी आकुर्डी परिसरातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा म्हणून आवाहन केले आहे.

गणेशोत्सव सजावटीसाठी प्लॅस्टिकचा वापर टाळा, सजावटीसाठी थर्माकोलचा वापर टाळा, गणेशमुर्ती शाडूमातीचीच घ्यावी, प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळा, गणेशमुर्ती शक्यतो लहान आकाराची घ्यावी, सजावटीसाठी प्लॅस्टिक फुलांचा वापर टाळा, गणेश विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करा असे आवाहन केले आहे.(Ganpati Festival) निसर्गाचा नाश म्हणजे मानवजातीचा नाश,  कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी, पर्यावरण का रखे ध्यान, तभी बनेगा देश महान अशा घोषणा देऊन जनजागृती केली.

Saksham dance event: सक्षम नृत्य कार्यक्रमात बहारदार नृत्य प्रस्तुती 

संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका योगिता काळे, शिक्षक – दीपाली मोहिते, प्रकाश कदम, वर्षा नलावडे, सुलभा दरेकर, ज्योती कडूदेशमुख, कविता रोडे, नीलिमा काकडे, नंदकिशोर ढोले, विकास गायकवाड, पूर्वप्राथमिक विद्यार्थी माधवी भोसले, गौरी वाडकर, मंजुषा बावधनकर, बालिका कुलकर्णी, सीमा सोनवणे  मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली.(Ganpati Festival) यामध्ये उपाध्यक्ष शब्बीर मुजावर,खजिनदार मनोहर कड, मीलन गायकवाड, स्वप्नील सुतार, सतीश उघडे, विलास चोळसे, मच्छिंद्र राजगुरव आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. हे अभियान 30 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक प्रभागातून राबविले जाणार आहे तसेच शाळा कॉलेज महाविद्यालयातूनही राबविले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.