Today’s Horoscope 28 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज: आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 August 2022

रविवार.

28.08.2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष — सामान्य दिवस.

राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 21.56 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

______________________

आजचे राशीभविष्य

मेष (शुभ रंग –  डाळिंबी)

आज मौज मजेस प्राधान्य द्याल. उंची वस्तू खरेदी कराल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील कलावंत असाल तर ग्लॅमरची चव चाखता येईल.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही व्यवहार रखडले असतील तर मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील तरुणांनी बेफिकीर वृत्तीस लगाम घालावा.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

रिकामटेकड्या चर्चेतून आज निष्पन्न काहीच होणार नाही. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज काम कमी व दगदग जास्त असा दिवस. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल.

कर्क- (शुभ रंग – राखाडी)

धंद्यात आवक चांगली राहील. गोड बोलून आपला स्वार्थ साधण्याची कला आज तुम्हाला चांगली जमेल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा ठेवली तर ती पूर्ण होईल.

सिंह – (शुभ रंग- भगवा)

आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. हितशत्रू सक्रिय असल्याने बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे.

कन्या- ( शुभ रंग – हिरवा)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात थोर मंडळीशी  काही प्रमाणात मतभेद होणार आहेत कठोर बोलल्याने नाती दुरावणार आहेत अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ – ( शुभ रंग- केशरी)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने शुभ चिंता तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही आज योग्य ठरणार आहेत काही दुरावलेले मित्र जवळ येतील..

वृश्चिक- ( शुभ रंग- नारंगी)

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.

धनु – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.

मकर- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. ज्येष्ठांना सत्संगाची ओढ लागेल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.

मीन- ( शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.

 

 

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.