Saksham dance event: सक्षम नृत्य कार्यक्रमात बहारदार नृत्य प्रस्तुती 

एमपीसी न्यूज: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ सक्षम ‘ या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन (Saksham dance event) शनिवार, 27 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते. स्वरदा भावे प्रस्तुत या कार्यक्रमात पूर्वा सारस्वत (भरतनाट्यम् ), डॉ. परिमल फडके यांच्या शिष्या दुर्गा टिळक तसेच नृत्यगुरु राजश्री खरे यांच्या शिष्यवृंदाचे बहारदार नृत्य सादरीकरण झाले.

प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी नृत्य गुरू आणि सहभागी कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार केला.डॉ. स्वाती दातार यांनी भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांचा सत्कार केला. अश्विनी भावे यांनी सूत्रसंचालन केले.

कौत्वम, अभिनय ,तिल्लाना  या नृत्य प्रस्तुती डॉ.परिमल फडके यांच्या ज्येष्ठ शिष्या दुर्गा टिळक यांनी सादर केल्या.पूर्वा सारस्वत यांनी (Saksham dance event)  कृती – ‘श्री विघ्नराजम् भजे’, अभंग -‘कृष्णे वेधिली विरहिणी बोले’तसेच शिवरंजनी रागातील तिल्लाना  सादर करून रसिकांची मने जिंकली. नृत्यगुरु राजश्री खरे यांच्या शिष्यांनी अलारिपू , किर्तनम् , तिल्लाना या नृत्य प्रस्तुती सादर केल्या.

Ganeshotsav : पुण्यातील मानाची सात मंडळे 2023 साली काश्मीरमध्ये साजरा करणार गणेशोत्सव 

युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी  मेघना साबडे यांनी ‘सक्षम ‘ ही नृत्य कार्यक्रमाची मालिका सुरू केली आहे.(Saksham dance event) हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता .‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 137 वा कार्यक्रम होता.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.