Balewadi News : मेट्रो काम सुरु असताना गॅस वाहिनी फुटल्याने आग

एमपीसी न्यूज- बालेवाडी येथे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे ( Balewadi News ) काम सुरु असून, या भागातील एस.के.पी. कॅम्पस समोर मेट्रोच्या कामासाठी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदत असताना एमएनजीएल गॅस वाहिनीला धक्का लागल्याने गॅस लिकेज होऊन आग लागली.या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

माहिती मिळताच पाषाण अग्निशमन केंद्राच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहचून आग पूर्णपणे विझवली. घटनास्थळी एमएमजीएल कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी वेळीच गॅस लाईन बंद केली.

 

ITI : आयटीआयमधील रोजगाराच्या संधीबाबत गुरुवारी कार्यशाळा

ही आग विझवीण्याचे काम अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहन चालक ( Balewadi News ) युवराज जाधव, फायरमन जवान बाळराज संगम, रोहित पुष्पराज, बाळासाहेब कारंडे, मदतनीस जवान सिद्धार्थ जोगदंड, अनिकेत जोगदंड, रोहिदास चौधरी यांनी  केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.