Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पंतसस्थेची 28 वी सर्वसाधारण सभा संपन्न

एमपीसी न्यूज – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षीक (Bhosari ) सर्वसाधारण सभा रविवारी (दि.30) पार पडली. हि बैठक संस्थेचे अध्यक्ष मुकुंद दत्तात्रय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी संचालक कैलास आवटे, मुबीन तांबोळी, संचालक बाळासाहेब गुंजाळ,वसंत कुटे, निंबा डोळस,अ‍ॅड.सुर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, गुलाब औटी, संतोष बिलेवार, शांतीश्वर पाटील, संचालिका ज्योती हांडे व संगीता इंगळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत संस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश न देता तो 9 टक्के द्यावा व उर्वरीत 1 टक्के लाभांश हा इमारत निधीला वर्ग करावा असा एकमताने ठराव करण्यात आला. या ठराव बरोबरच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचा अध्यक्ष मुकुंद आवटे यांनी संस्थेच्या वार्षिक आर्थिक लेखाजोखा सभासदा पुढे मांडला.

Pune Metro :  पुणे ते पिंपरी प्रवास होईल अवघ्या 22 मिनिटांत

यामध्ये संस्थेचे वसुल भांडवल हे 2 कोटी 10 लाख रुपये असून ठेवी 25 कोटी 26 लाख 70 हजार आहेत. तसेच 20 कोटी 2 लाख 43 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्य़ा आर्थिक वर्षात संस्थेला 68 लाख 14 हजार 502 रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचेही या लेखाजोख्यात सांगण्यात आले.

तसेच पुढील काळात व्यवहार हे ऑनलाईन होणार असून ग्राहकांना क्यू आरकोड व मोबाईल अ‍ॅपद्वारे सुविधा मिळणार आहेत.त्यामुळे बँकेचे व्यवहार अधिक सुखकर होणार आहेत. सभासदांनीही जास्तीत-जास्त व्यवहार संस्थेच्या माध्यमातून करावेत असे आवाहान यावेळी कऱण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुहास गटकळ यांनी केले तर संचालक वसंत कुटे यांनी आभार (Bhosari ) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.