Bhosari Crime News : ऑनलाईन पद्धतीने नागरिकाचे बँक खाते रिकामे करत परस्पर कर्ज काढत केली सव्वा दोन लाखांची फसवणूक  

एमपीसी न्यूज – बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगत एकाने (Bhosari Crime News) ऑनलाईन पद्धतीने एका नागरिकांचे बँक खाते तर रिकामे केलेच शिवाय परस्पर संबंधीत बँक खात्यावर दोन लाखांचे कर्ज काढत नागरिकाची सव्वा दोन लाखाचे फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 27 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी येथे घडला होता.

 

 

याप्रकऱणी कृष्णा बालाजी रोडगे (वय 34 रा.भोसरी) यांनी सोमवारी (दि.20) भोसरी पीस ठाण्यात फिर्याद दिली असून 9339537291 या मोबाईल क्रमांक धरकावर गुनहा दाखल कऱण्यात आला आहे.

 

 

PCMC : विकास कामांची देयके 31 मार्चपर्यंत सादर करा, आयुक्तांचा आदेश

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांना आरोपीने वरील मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत मी आयसीआयसी आय बँकेत मॅनेजर असल्याचे भासवले. त्याने इएमआय बाबतची शंका दूर कऱण्यास फोन केल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना एनी डेस्क नामाचे सक्रीन शेअरींगचे अप डाऊनलोड करायला लावले,त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 24 हजार रुपये काढून घेतले व त्याच खात्यावरपरस्पर 2 लाख रुपयांचे कर्ज घेत फिर्यादी यांची 2 लाख 24 हजार रुपयाची फसणूक केली आहे.यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास (Bhosari Crime News) करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.