Wakad: कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची 10 लाख रुपयांची (Wakad)फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 2  जानेवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.
महिलेने गुरुवारी (दि.15) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून (Wakad)रमा देवी, राकेश शर्मा, शंकराचार्य उपरेका, अशल्ये, विविध बँक खाते धारक यांचवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimpri : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पिंपरीतून महायुतीच्या उमेदवाराला 60 हजारांचे लीड देणार – अमित गोरखे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फेसबुक लिंक वरून संपर्क साधला. पुढे IBKR,Cresset Accadmy व Goldman Sachs कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. यावेळी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले.
फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगून त्यांची 10 लाख 69हजार 575 रुपयांची फसवणूक करण्यात आली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.