PCMC : विकास कामांची देयके 31 मार्चपर्यंत सादर करा, आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध (PCMC) विभागामार्फत सन 2022-23  या आर्थिक वर्षात राबविलेल्या विकास कामांची महसुली अथवा भांडवली देयकांची बिले 31 मार्चपर्यंत लेखा विभागाकडे सादर करावी लागणार आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे.

 

 

Talegaon MIDC : स्थानिक शेतकऱ्यांनी केले ‘ह्युंदाई’ कंपनीचे पेढे वाटून व फटाके वाजवून स्वागत

महापालिका सन 2022-23 चे सुधारीत व सन 2023-2024 च्या मुळ अंदाजपत्रकास आयुक्त सिंह यांनी 14 मार्चला मंजुरी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्ष 31 मार्चला संपणार आहे. त्यापूर्वी चालू आर्थिक वर्षातील देयकांची अदायगी करून चालू आर्थिक वर्षामध्ये विविध महसुली, भांडवली योजना व कामे करण्यात आलेल्या तरतूदी चालू आर्थिक वर्षामध्येच खर्ची टाकणे आवश्‍यक आहे. अन्यथा या कामांचे अथवा योजनांचे दायित्व पुढील वर्षामध्ये जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी वर्षातील नियोजित कामांना तरतूद अपुरी पडण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी चालू आर्थिक वर्षामध्ये ज्या महसुली भांडवली योजना, विकास कामांना तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्यांची देयके 31 मार्चअखेर सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत लेखा विभागाकडे सादर करावीत. तसेच चालू आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 11 दिवस शिल्लक असल्याने सर्व विभागांनी 31 मार्चपर्यंत साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही (PCMC) कार्यालये सुरू ठेऊन देयकांच्या अदायगीचे लेखा विषयक कामकाज पूर्ण करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.