Bhosari : गॅस लिकेज होऊन लागलेल्या आगीत चार जण जखमी

एमपीसी न्यूज – घरातील गॅस लिक झाल्यामुळे घराला आग लागली. या आगीमध्ये चार जणांना भाजले. ही घटना आज (रविवारी) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास भोसरी मधील डोळस नगर येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोळस नगर येथे भगवान महादेव जाधव यांचे घर आहे. त्यांच्या घरात गॅस लिकेज झाल्याने पहाटे बाराच्या सुमारास घराला आग लागली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

लिडिंग फायरमन बापूसाहेब मळेकर, सुरज गवळी, प्रवीण लांडगे, भगवान यमगर, संजय महाडिक, बाळासाहेब मोरे, राजेंद्र महाडिक, सईद शेख, महेंद्र पाठक, एन.के.तांबोळी यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.