Bhosari News : पैशाच्या व्यवहारावरून अपहरण करून एकाला लुटले

एमपीसी न्यूज – पैशाच्या व्यवहारावरून एकाला अपहरण (Bhosari News) करून लुटले. हा प्रकार भोसरी व हिंजवडी येथे 24 जानेवारी 2023 रोजी घडला.

याप्रकरणी विकास महादू दरवडे ( वय 45, रा. मु. पो. उढाणे, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र बाबूराव निकम (वय 38, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे.

पैशाच्या व्यवहारावरून आरोपी हे फिर्यादीच्या ऑफिसमध्ये आले. त्यांना शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने मोटारीतून हिंजवडी येथे घेवून गेले. पाच हजार रुपये रोख व 34 हजार 600 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

Influenza H3N2 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सतर्क; ‘या’ रुग्णालयात होणार उपचार

फिर्यादीच्या हातातील हिरेजडित चांदीच्या चार अंगठ्या व क्रेडिट कार्ड काढून घेतले. फिर्यादीच्या भावाच्या नावे असलेली मोटार ताब्यात घेतली. फिर्यादीला मारण्याची (Bhosari News) भीती घालून मोटारीच्या पेपरवर त्यांची सही घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.