Influenza H3N2 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सतर्क; ‘या’ रुग्णालयात होणार उपचार

एमपीसी न्यूज :  इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूच्या रुग्ण संख्येत (Influenza H3N2) राज्यभरात वाढ होताना दिसून येत आहे. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरात देखील दिसून येत आहे. या विषाणूमुळे आज भोसरीमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून बंधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकिय विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

आज ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याला COPD (फुफुसाचा आजार) तसेच Atrial fibrillation (हृदयाचा आजार) हे आजार देखील होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रुग्णांची सद्यस्थिती –

  • 1 जानेवारीपासून इन्फ्लुएंझा ए H3N2 बाधित आढळून आलेली रुग्ण संख्या – 04
  • बरे झालेले रुग्ण – 03
  • मृत झालेली रुग्ण संख्या – 01

सद्यस्थितीत रुग्णालयामध्ये एकही रुग्ण दाखल नसला तरीही सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर गोफणे यांनी म्हंटले आहे.

महानगरपालिकेकडून करण्यात आलेली व्यवस्था –  Influenza H3N2

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी रुग्णालय व कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूच्या रुग्णांसाठी प्रत्येकी दहा खाटांचे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच या आजारावर औषधोपचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.

महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन – 

  • इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूस घाबरुन जाऊ नये.
  •  सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.
  • नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.