Hinjawadi News : निवृत्त न्यायाधिशाची 1 लाख 67 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लिंकवर पैसे भरण्याचे सांगत एका निवृत्त न्यायाधिशाची 1 लाख 67 हजार रुपयांची (Hinjawadi News) फसवणूक झाल्याचा प्रकार बावधन येथे उघडकीस आला.

याप्रकरणी शिवाजीराव नारायणराव सरदेसाई (वय 70, रा. एफ 901 लोरिया ग्रेस, बावधन खुर्द, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सरदेसाई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांचा मुलगा कीर्तिराज हे यूएसए येथे रहायला आहे. कीर्तिराज यांच्या मुलीसाठी फिर्यादी यांनी कपडे व स्वीट पार्सलने इंडोफाइन एक्स्प्रेस या कुरियर कंपनीमार्फत पाठवले होते. पाठवलेल्या (Hinjawadi News) कुरियरचा पत्ता चुकला आहे, असे फिर्यादीला खोटे भासवून त्यांना एक लिंक पाठवली.

Influenza H3N2 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सतर्क; ‘या’ रुग्णालयात होणार उपचार

त्यावर पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांची 1 लाख 67 हजार 997 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.