Bhosari News : ‘अग्रवाल समाज फेडरेशन’च्या वतीने सोमवारी लसीकरण शिबिर

एमपीसी न्यूज – ‘अग्रवाल समाज फेडरेशन’च्या वतीने अग्रवाल समाज्यातील नागरिकांसाठी सोमवारी (दि.12, एप्रिल) मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 45 वर्षांवरील नागरिकांना ही लस घेता येईल. भोसरीतील ओम हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची मोफत सोय करण्यात आली आहे.

अग्रवाल समाज फेडरेशन मेडिकल कमिटीचे डॉ. अशोक अग्रवाल आणि डॉ. संतोष अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून दुपारी 12 ते 3 कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असेल. कृष्णकुमार गोयल फाउंडेशन आणि जगदिश सिंगल यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.

अग्रवाल समाज फेडरेशन पुणेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद बन्सल, सचिव के. एल बन्सल, कोषाध्यक्ष श्याम गोयल, महिला समिती अध्यक्ष निता अग्रवाल यांनी अग्रवाल समाज्यातील नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केले आहे.

* लसीकरणाचे स्थळ

ओम हास्पिटल,201, हुतात्मा चौक, 05, भोसरी, आळंदी रोड, भोसरी .

* रेजिस्ट्रेशनसाठी संपर्क – अतुल जनजुर्के – 9850940580 / 08888825601

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.