Birthday Gift : पत्नीची सायकल भेट ते एक वर्षात 10,000 किमी सायकल प्रवासाचे लक्ष्य ; ‘भेट ते आव्हान’ या प्रवासाची कहाणी

एमपीसी न्यूज – एकावन्नव्या वाढदिवशी पत्नीने सायकल भेट दिली आणि पुढील वाढदिवसापर्यंत  10,000 किमी सायकल प्रवासाचे लक्ष्य समोर ठेवले.  विचारपूर्वक दिलेल्या या भेटीला आव्हान समजून त्यांनी 52 व्या वाढदिवसापूर्वी सायकल प्रवासाचा 10 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. निगडीतील सीए के. एल. बन्सल आज (शनिवार, दि. 07) आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मागील एक वर्षाचा त्यांनी सायकलिंगच्या आव्हानाचा ते सायकल राईडच्या ‘प्रवासाचा’ अनुभव सांगितला.

सीए के. एल. बन्सल यांनी 52 व्या वाढदिवशी आपल्या आठवणींना उजाळा दिला. बन्सल म्हणाले, ’07 ऑगस्ट 2020 रोजी पत्नीने मला माझ्या आवडीची सायकल भेट दिली आणि पुढील वाढदिवसापर्यंत 10 हजार किमी सायकलिंग पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवले. पत्नीने फार विचारपूर्वक दिलेली ही भेट आणि आव्हानाचा स्वीकार करून सायकलिंगच्या नव्या प्रवासाला सुरूवात झाली.


‘माझे मित्र विजेंदर बन्सल आणि निखिल गोयल यांच्याकडून फिटनेस ड्राइव्हबद्दल प्रेरित झालो आणि त्यांनी मला साइकल राईड्सबद्दल माहिती दिली. विजेंदरनी मला गजानन खैरे यांच्या नेतृत्वाखालील चालणारी संस्था ‘इंडो ऐथ्लेटिक सोसायटी’शी ओळख करून दिली.’

पहिली राईड निगडीपासून शिंदे छत्री, वानवाडी पर्यंत 50 किमीची होती, इंडो अ‍ॅथलेटिक सोसायटी (IAS) च्या सदस्यांसह 100 किमी लोणावळा पर्यंत प्रवास केला आणि  त्यानंतर माझ्या सायकलचे चाक कधीच थांबले नाही.

बन्सल पुढे सांगतात, ‘आम्ही 2021 वर्षाची सुरवात अलिबाग राईडने केली, त्यानंतर 26 जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया, तिरुपती मंदिर- केतकावळे, पंढरपूर सायकल वारी, वाई- गणपती सायकल वारी, देहू गाथा मंदीर, कासारसाई धरण, आळंदी मंदिर, दगडूशेठ मंदिर, शिंदे की छत्री, सारस बाग, पुणे असे निरनिराळे डेस्टिनेशन आणि सोबती सायकल असे करत एका वर्षात बराच परिचित-अपरिचित भागात प्रवास केला.

‘सायकल प्रवासाने मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट केले आहे. रस्ते शोधणे, नवीन ठिकाणांना भेट देणे आणि दररोज नवीन व्यक्तींना भेटणे हा एक चांगला अनुभव आहे. एका वर्षात दहा हजार किलो मीटर सायकल प्रवासाने मला आरोग्याचे महत्व नव्याने पटवून दिले.’ असे बन्सल यांनी नमूद केले.


सायकलिंग ही व्यायामाची एक उत्तम पद्धत आहे. एकटे किंवा ग्रुपमध्ये सायकलिंग आपण करू शकतो. ‘वय फक्त एक संख्या आहे, दररोज व्यायाम करा, स्वतःच्या आरोग्यासाठी किमान एक तास असा संदेश बन्सल यांनी यानिमित्ताने दिला.

‘माझ्या पत्नीने दिलेली भेट आणि आव्हान याने मला खूप काही शिकवलं असल्याचे बन्सल यांना आवर्जून नमूद केले. एक वर्षाचा प्रवास अविस्मरणीय अनुभवांनी भरला आहे आणि यासाठी मी पत्नीचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो’, असे बन्सल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.