Bhosari : नवीन शैक्षणिक पध्दतीमध्ये डीजीटल लाॅकर चे विद्यार्थ्यासाठी विशेष महत्व — डाॅ हंसराज थोरात

एमपीसी न्यूज – नवीन धोरणानुसार ‘ विद्यार्थ्यांसाठी एकाच(Bhosari ) वेळी दोन पदव्या घेता येतील,त्यांच्या आवडीप्रमाणे विविध क्षेत्राचा अभ्यास तो करू शकतो, तसेच डिजिटल लॉकर मुळे विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक पात्रता देशात आणि परदेशात दाखवताना त्याचा उपयोग होईल असे मत व्यक्त केले.

भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन(Bhosari) सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयात 1 व 2 डिसेंबर रोजी स्वर्गीय प्रा. प्रकाश पगारिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सातवी प्रकाश व्याख्यानमाला नुकतीच पार पडली.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रा. डॉ. हंसराज थोरात प्राचार्य, शरदचंद्र पवार कला वाणिज्य व संगणक महाविद्यालय आळंदी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गदिया, महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे मुख्य संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर उपस्थित होते.

Khed : उघड्या दरवाजावाटे एक लाख रुपयांचे दागिने चोरी, आरोपी अटकेत
या व्याख्यानमालाचे प्रथम पुष्प शरदचंद्र पवार कला वाणिज्य व संगणक महाविद्यालय आळंदी येथील प्राचार्य प्रा.डॉ. हंसराज थोरात यांनी स्व. प्रा. प्रकाश पगारीया यांचे संयोजन कौशल्य,संभाषण कौशल्य,आणि नेतृत्व कौशल्य एवढे उत्कृष्ट होते की त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशातही शिक्षणक्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान दिले असते’.. असे मत व्यक्त केले .

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आपले बंधू प्रेमाबद्दलचा ओलावा व्यक्त करून आजतागायत विविध उपक्रमांनी आम्ही बंधूंचे स्मरण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने गेली 39 वर्ष स्वर्गीय प्रा. प्रकाश पगारिया स्मूर्ती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्या वतीने केले जात आहे व महाविद्यालयाच्या वतीने गेली सहा वर्षे प्रकाश व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे व्याख्यानाची आयोजन करून विद्यार्थीपयोगी व समाजपयोगी कार्यक्रम राबविणे ही खरी श्रद्धांजली प्रा. प्रकाश पगरीया यांना ठरेल अशी भावना व्यक्त केली.

प्रा. विभा ब्राह्मणकर व प्रा. सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. पांडुरंग भास्कर यांनी आभार मानले सदर व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी डॉ.विजय निकम, डॉ.हनुमंत शिंदे, प्रा.उमेश लांडगे, डॉ. स्वाती वाघ प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा.महालक्ष्मी ठुबे, प्रा. रूपाली आगळे प्रा. प्रशांत रोकडे सारिका बेलदोर व महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.