Khed : उघड्या दरवाजावाटे एक लाख रुपयांचे दागिने चोरी, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे चोराने एक लाख रुपयांचे (Khed)दागिने चोरून नेलेआहेत. ही चोरी 10 जुलै ते 1 डिसेंबर या कालावधीत शेलपिंपळगाव, खेड येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Khed)आहे. यावरून पोलिसांनी प्रथमेश राधी दौंडकर (वय 20 रा.शेलपिंपळगाव) व सुरज शंकर धादवड (वय 23 रा. शेलपिंपळगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

PCMC : महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची मंत्रालयात बदली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून आरोपीने उघड्या दरवाज्यावाडे घरात प्रवेश करून 90 हजार रुपयांचे साडे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व 8 हजार रुपयांचे सोन्याचे पेंडल असा एकूण 98 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून चाकण पोलीसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.